
मुंबई – महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक धोरणामध्ये इयत्ता १ ली पासून हिंदी विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. या विरोधात मनसेने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मनसेच्या वतीने मुंबईमध्ये काही ठिकाणी ‘आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही’, असे फलक लावण्यात आले आहेत. या फलकाद्वारे इयत्ता १ ली पासून हिंदी अनिवार्य करण्याच्या धोरणाला मनसेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी मुंबई आणि ठाणे येथे १८ एप्रिल या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा- २०२४’ या शैक्षणिक धोरणाच्या प्रती सामूहिकरित्या जाळल्या.