गोव्याशी निगडित महत्त्वाची मूळ पोर्तुगीज कागदपत्रे पोर्तुगालमधून गोव्यात आणणार ! – पुरातत्व मंत्री फळदेसाई

‘‘पोर्तुगालकडून पाहिजे असलेल्या कागदपत्रांची सूची सिद्ध झाल्यानंतर गोवा सरकार केंद्रशासनाच्या माध्यमातून पोर्तुगालशी संपर्क करणार आहे. गोव्याशी संबंधित कागदपत्रे गोव्याला  मिळाली पाहिजेत. याद्वारे अनेक गुपिते उघड होणार आहेत.’’

पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची सिद्ध करण्यासाठी तज्ञांचा सहभाग असलेल्या समितीचा अंतरिम अहवाल सरकारला सुपुर्द – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव !

ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याची मुसलमान पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली

‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

(म्हणे) ‘रामदास संत नव्हे, महाराष्ट्रातील जंत !’ – श्रीमंत कोकाटे

समर्थ रामदासस्वामी यांना जातीयवादी म्हणणारे आणि एकेरी संबोधणारे, हिंदु अन् ब्राह्मण द्वेष्टे श्रीमंत कोकाटे ! अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते, याची सर्वांना कल्पना आहे ! हिंदु निद्रिस्त असल्यामुळेच कोकाटे यांच्यासारख्यांचे फावले आहे !

इंग्रजांकडून भारताचा इतिहास विकृत कसा केला गेला ?

भारतीय संस्‍कृती नष्‍ट करण्‍यासाठी वापरण्‍यात येणारे ते प्रचार साहित्‍य होते. याच्‍या परिणामातून रशिया आणि चीन यातून आधीच मुक्‍त झाले आहेत. भारत मात्र अजून त्‍यांच्‍या जाळ्‍यात अडकलेला आहे.

श्रीराममंदिराच्या खोदकामात सापडले आहेत देवतांच्या मूर्ती आणि स्तंभ !

यामध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आणि स्तंभ दिसत आहेत. याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. श्रीराममंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या वेळी सापडलेले अवशेष  दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.

पाद्री बॉलमॅक्‍स पेरेरा यांचे बोल गोमंतकियांचा अनादर करणारे !

पाद्री बॉलमॅक्‍स यांनी केलेल्‍या समस्‍त गोमंतकियांच्‍या अपमानाचा खरेतर निषेध व्‍हायला हवा होता. अस्‍मितेच्‍या ठिणग्‍या नको तिथेच पेटू लागल्‍या की, अशी फसगत होते. सांस्‍कृतिक विस्‍तारवादाला पायबंद घालण्‍याची आणि त्‍यामागील संहितेतील विचारधारेला रोखण्‍याची आवश्‍यकता आहे.

नामांतराची आवश्‍यकता !

परकीय संस्‍कृतीच्‍या खुणा पुसून टाकण्‍याची एकही संधी शासन आणि नागरिक यांनी सोडू नये ! हिंदू महारक्षा आघाडीने उपस्‍थित केलेले हे सूत्र देशभक्‍त गोमंतकीय आणि भाजप शासन उचलून धरेल अन् आणखी एक परकीय जोखड या भारतभूच्‍या अंगावरून दूर फेकले जाईल आणि संस्‍कृती जोपासण्‍याचा प्रयत्न करील अशी आशा करूया !

गोवा : वर्ष १९७० मध्येच ‘वास्को’ शहराचे नामांतर ‘संभाजी’ झाले होते !

२० नोव्हेंबर १९७० या दिवशीच्या राजपत्रात आहे नोंद ! स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे हे अपुरे राष्ट्रीय कार्य पूर्ण करून त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या वर्षात त्यांना अनुरूप श्रद्धांजली द्यावी, अशी समस्त गोमंतकियांची अपेक्षा भाजप सरकारने पूर्ण करावी.

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत छोट्या चर्चसमोर देवीच्या मूर्तीची स्थापना

पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यामुळे ५०० वर्षांनंतर देवी मूळ जागी विराजमान झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे.