तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा मंदिरांचे ‘स्थलपुराण’ पालटण्याचा हिंदुद्वेषी निर्णय !

चेन्नई – तमिळनाडू राज्यातील सर्व हिंदु मंदिरांचे ‘स्थलपुराण’ पालटून ते पुन्हा लिहिण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ‘प्राचीन काळातील सर्वोत्कृष्ट स्थापत्यकला ही हिंदूंनी साकारली होती. विविध मंदिरांची रचना हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. या स्थापत्यकलेशी हिंदूंचा असलेला संबंधच नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे’, असे हिंदूंचे म्हणणे आहे.

‘स्थलपुराण’ म्हणजे काय ?

स्थलपुराण’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘प्रादेशिक इतिहास’ असा होतो. एखादा परिसर, मंदिरे किंवा क्षेत्र येथील ऐतिहासिक आणि धार्मिक माहिती यांची माहिती असते. संबंधित मंदिरे, परिसर किंवा क्षेत्राविषयीची माहिती ही हस्तलिखितांच्या स्वरूपात किंवा संबंधित क्षेत्राशी निगडित धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते.

संपादकीय भूमिका 

द्रमुक सरकार तमिळनाडूतील हिंदु परंपरा आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूबहुल भारतात असा पक्ष एखाद्या राज्याचा कारभार पहात असणे, हे हिंदूंना लज्जास्पद !