गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – गाझियाबादचे नामांतर करण्याच्या संदर्भात नगरपालिकेत चर्चा करण्यात आली. यासाठी ‘गजनगर’ आणि ‘हरनंदीनगर’ या नावांवर चर्चा करण्यात आली. या संदर्भात महापौर सुनीता दयाल यांनी सांगितले की, नगरपालिकेत नामांतराचा प्रस्ताव संमत झाला की, तो पुढे राज्यशासनाकडे आणि नंतर अंतिम संमतीसाठी केंद्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. वर्ष १७४० मध्ये मोगलांचा शासक गाझीउद्दीन याच्या नावावरून या जिल्ह्याचे नाव ठेवण्यात आले होते.
सौजन्य न्यूज स्टेट
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शहरांना आक्रमकांची नावे कायम असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! |