मुंगेर (बिहार) येथे भाजपचे राज्य प्रवक्ते गोळीबारात घायाळ

बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने ! बिहारमध्ये भाजप सत्तेत असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

‘गोवंश हत्याबंदी’ कायद्याची प्रभावी कार्यवाही आणि ‘लव्ह जिहाद’विषयी कठोर कायदा करावा ! – गोसेवकांची मागणी

गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना त्याची प्रभावी कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी गोसेवकांना पदमोर्चा काढणे सरकारसाठी लज्जास्पद !

आंदोलनांच्या नावाखालचा हिंसाचार !

कृषी कायदे रहित करण्याच्या मागणीच्या नावाखाली प्रजासत्ताकदिनी राजधानी देहलीत शेतकरी हे गोंडस नाव धारण करून असंख्य गुंडांनी जी हिंसा केली, ती सर्व जगाने पाहिली. हे पहात असतांना भारतात कायदा आणि सुव्यवस्था नावाची कुठली गोष्ट शिल्लक उरली आहे का ?, असा प्रश्‍न कुणालाही पडला नसेल, तरच नवल !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ९ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांना कारागृहात डांबा !

अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांध तरुणाचा बलात्कार करून चित्रीकरण

वासनांध धर्मांधांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भारतात आल्यावर स्वर्गात आल्याचा अनुभव आला ! – हसीना दिलशाद अहमद

पाकिस्तानात भारतीय मुसलमानांचाही छळ केला जातो.

आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर (जिल्हा जळगाव) येथे गुन्हा नोंद

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांविषयी अपमानास्पद लिखाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

रायगड येथून अमली पदार्थ विक्रेत्यास अटक

अमली पदार्थ विक्रेता आरिफ भुजवाला याला अमली पदार्थ नियंत्रक विभागाने रायगडमधून अटक केली आहे. आरिफ हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीश इब्राहिमचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.

लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक केलेले अधिकारी सुरेश रेड्डी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.