रायगड येथून अमली पदार्थ विक्रेत्यास अटक

अमली पदार्थांच्या तस्करीची बजबजपुरी झालेली मुंबई !

मुंबई – अमली पदार्थ विक्रेता आरिफ भुजवाला याला अमली पदार्थ नियंत्रक विभागाने रायगडमधून अटक केली आहे. आरिफ हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीश इब्राहिमचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे. आरिफकडे १०० कोटींहून अधिकची संपत्ती आहे. त्यात महागड्या गाड्या, घर आणि भूखंड यांचा समावेश आहे.

आरिफ मुंबईच्या डोंगरी परिसरात ड्रग्जची लॅब चालवत होता. तेथे मेफेड्रोन, मेथमफेटामाइन आणि एफेड्रिन यांसारखे अमली पदार्थ एका घरामध्ये सिद्ध केले जात होते.