लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक केलेले अधिकारी सुरेश रेड्डी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

भ्रष्टाचारग्रस्त भारत ! 

सांगली, २६ जानेवारी (वार्ता.) – बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रेड्डी यांना २६ जानेवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली.