अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांध तरुणाचा बलात्कार करून चित्रीकरण

  • चित्रीकरणाद्वारे मुलीच्या कुटुंबावर धर्मांतरासाठी दबाव !
  • मुलगा पसार असल्याने मुलीशी स्वतःचाच विवाह लावून देण्याची वडिलांची मागणी !

अशा वासनांध धर्मांधांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

बलिया (उत्तरप्रदेश) – येथे अब्दुल रहमान याने शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन हिंदु  मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण केले. त्याआधारे तो या मुलीच्या कुटुंबियांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता. हे प्रकरण गावातील पंचायतीकडे गेले असता अब्दुल याच्या वडिलांनी ‘माझा मुलगा पसार आहे, तर या मुलीचे माझ्याशीच लग्न लावून द्यावे’, अशी मागणी केली. या घटनेविषयी पोलिसांना कळवण्यात आल्यावर पोलिसांनी अब्दुल आणि त्याच्या वडिलांना अटक केली. त्यांच्यावर लव्ह जिहादविरोधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.