२५० ते ३०० धर्मांध मुसलमानांची गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर दगडफेक !

  •  खालापूर (जिल्हा रायगड) येथील गोवंश तस्करीचे प्रकरण

  • आक्रमणकर्त्यांमध्ये लहान मुले आणि महिला यांचा समावेश !

  • गोरक्षक आणि पोलीस घायाळ

  • १२ जण कह्यात, ६० जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद

प्रतिकात्मक चित्र

खालापूर (रायगड) – खालापूर तालुक्यातील हाळ बुद्रुक येथे १२ मार्चच्या मध्यरात्री गोवंश तस्करीसह कत्तलीची माहिती मिळाल्यावर गोरक्षक आणि पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र २५० ते ३०० धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण करत दगडफेक केली. यात काही गोरक्षक आणि पोलीस कर्मचारी घायाळ झाले.

१. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकल किचन हॉटेल परिसरात गोरक्षकांना दोन गायी आढळून आल्या. ५० फूट खोल खड्ड्यात गोवंशियांचे अवशेष आणि कातडी सापडली. याविषयी गोरक्षकांनी पोलिसांना बोलावले.

२. काही वेळातच २५० ते ३०० मुसलमान जमले आणि त्यांनी पोलीस अन् गोरक्षक यांच्यावर दगडफेक केली. यात काही गोरक्षक गंभीर घायाळ झाले. (यातून धर्मांध मुसलमानांची नियोजनबद्धता आणि आक्रमकता लक्षात येते ! – संपादक)

३. आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमानांमध्ये गावातील लहान मुलांसह महिलाही होत्या. त्यांच्या हातात काही हत्यारे आणि दगड होते.

४. परिस्थिती बिघडत चालल्याने गोरक्षक आणि पोलीस सुरक्षेसाठी खोपोली-मुंबई महामार्गावर आले; मात्र मुसलमानांनी महामार्गावरील वाहनांवरही दगडफेक केली.

५. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आणि काही घंट्यांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

६. या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना कह्यात घेतले असून चौकशी चालू आहे, तर ६० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समीर सय्यद, मुर्तुजा मेटकर, जावेद लियाकत सोंडे, कादीर लतीफ कर्जीकर, रियाज जळगावकर, उस्मान जळगावकर, समीर दुस्ते, मुजफ्फर कर्जीकर, मोज्जम मांडलेकर, मुजीब जळगावकर, आसिफ बेडेकर अशी जमावातील काहींची नावे आहेत.

७. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून ‘दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’, असे आश्‍वासन दिले आहे.

८. या घटनेनंतर गोरक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह विविध हिंदु संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजण्यास सिद्ध आहोत’, अशी चेतावणी गोरक्षकांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘देशातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आता या घटनेवरून चकार शब्दही काढत नाहीत. भारताची आणि पर्यायाने हिंदूंची प्रतिमा मलीन करणार्‍या या कंपूला हिंदूंनी आता जाब विचारला पाहिजे !
  • गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !