Devendra Fadnavis On Cow Slaughter : गोहत्याप्रकरणी वारंवार गुन्हे नोंद झाल्यास ‘मकोका’ लावणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – गोहत्येच्या प्रकरणी गोतस्करांवर वारंवार गुन्हे नोंद होत आहेत. यापुढे असे झाल्यास संबंधितांवर संघटित गुन्हेगारीच्या (‘मकोका’च्या) अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील गोतस्कर असलेल्या कुरेशी कुटुंबियांकडून हिंदु कुटुंबाला फटाके वाजवण्यावरून केलेली मारहाण आणि त्यांची दहशत यांवरून विधानसभेत प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.

गोतस्कर असलेल्या मुसलमान कुटुंबाने केलेल्या मारहाणीत एका हिंदूची हत्या !

आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे कुरेशी परिवाराने नोव्हेंबर महिन्यात हिंदु कुटुंबाच्या फटाके वाजवण्यावरून आक्षेप घेतला आणि मारहाण केली. या भागात गोतस्कर कुरेशी कुटुंबीय आणि टोळी यांची दहशत आहे. त्यांच्यावर गोहत्या, तसेच गोतस्करी यांप्रकरणी १८ ते २० खटले प्रविष्ट (दाखल) आहेत. त्यांच्या दहशतीमुळे या प्रकरणी कुणीही तक्रार केली नव्हती. एका महिन्याने अतिक कुरेशी याच्यावर या प्रकरणी गुन्हा नोंद झाला; मात्र त्याला जामीन मिळाला. अशातच मारहाणीत घायाळ झालेल्या हिंदु कुटुंबातील १ जण मृत्यूमुखी पडला. या प्रकरणी पोलिसांनी अकार्यक्षमता दाखवली आहे.

याविषयी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणी कुणीही गुन्हा नोंद करण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. एका जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुढील कारवाई चालू आहे. (हिंदूंच्या देशात त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या मुसलमान गुंडांच्या विरुद्ध कुणी तक्रार करण्यासही धजावत नाही, हे भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक ! ही लोकशाहीची वास्तविक हत्या आहे, हे आता कथित लोकशाहीप्रेमींना ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक)