
बेळ्तंगडी (कर्नाटक) – १० ते १५ गायींना आतमध्ये कोंबून मंगळुरूच्या दिशेने निघालेले वाहन कळिया न्यायतर्फाजवळच्या जारीगेबैलू येथे हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. गायींची हत्या करण्यासाठी त्यांना पशूवधगृहामध्ये घेऊन जात असल्याची माहिती हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. (जी माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही ते त्याकडे दुलर्क्ष करतात ? – संपादक) या कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग करून त्याला थांबवले, तेव्हा चालक वाहन सोडून पसार झाला.
(गोहत्या रोखण्यासाठी सरकारने गोहत्याबंदी कायदा लागू करून त्याची कठोरपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
याविषयी हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळ्तंगडी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहन आणि गायी यांना कह्यात घेतले आहे.