नागपूर येथे लाचप्रकरणी २ अधिकार्‍यांच्या घरातून २ कोटी रुपयांची रोकड जप्त !

भरघोस वेतन आणि शासनाच्या सर्व सुविधा असतांनाही लाच मागणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची, तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे. तसे केल्यासच धास्ती वाटून भ्रष्टाचार न्यून होईल !  

Delhi Fake Medicines : देहलीतील सरकारी रुग्णालयांमधील सदोष औषध पुरवठ्याची सीबीआयकडून चौकशी करा ! – उपराज्यपालांची शिफारस

या प्रकरणी प्रशासकीय आणि इतर संबंधित अधिकार्‍यांचे निलंबन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुसेसावळी (जि. सातारा) येथील दंगलीचे अन्वेषण ‘सीबीआय’ आणि ‘एन्.आय.ए.’ यांनी करावे !

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात सप्टेंबरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेचे अन्वेषण ‘सीबीआय’ (केंद्रीय अन्वेषण विभाग) आणि ‘एन्.आय.ए.’कडून (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) व्हावे. आम्ही या प्रकरणाचा अहवाल सिद्ध केला असून अन्वेषण यंत्रणांना पाठवणार आहोत.

मणीपूरमध्ये २ मासांपासून बेपत्ता असणार्‍या मैतेई हिंदु विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड

मणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

१०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांच्या धर्माविषयी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याच्या विरोधात साधा गुन्हा नोंद होण्यासाठी हिंदूंना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागते, यापेक्षा लाजिरवाणी ती गोष्ट कोणती ? हिंदूंना त्यांच्याच देशात कोणतेच मूल्य राहिलेले नाही, हेच यावरून दिसते !

सरकारचे साक्षी-पुरावे संपल्‍याची सीबीआयची माहिती !

महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्‍या हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्‍याचा अर्ज सादर केला आहे. त्‍यामुळे संशयितांचे म्‍हणणे (जबाब) नोंदवले जाणार असून त्‍यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.

दाभोलकर हत्‍या प्रकरणी सीबीआय अन्‍वेषणाचा अंतिम अहवाल १३ सप्‍टेंबरला न्‍यायालयात सादर होणार !

अंनिसचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाचे (सीबीआयचे) अन्‍वेषण अधिकारी एस्.आर्. सिंह यांची उलटतपासणी ५ सप्‍टेंबर या दिवशी पूर्ण झाली. अधिवक्‍त्‍या सुवर्णा वस्‍त यांनी सिंह यांची उलटतपासणी घेतली.

देहली मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या साहाय्यक संचालकास अटक

अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !

मणीपूर हिंसाचाराचे खटले गौहत्ती (आसाम) येथे चालणार

मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नोंदवलेले खटले आसामची राजधानी गौहत्ती येथे स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

अल्‍पसंख्‍यांक मंत्रालय बंद करा !

हिंदूबहुल देशात अल्‍पसंख्‍यांकांना सवलती देऊन देशाचे खरोखर भले झाले आहे का ? याचा विचार करण्‍याची वेळ आता आली आहे !