अनिल देशमुख स्वीय साहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते ! – सचिन वाझे यांचा कारागृहातून आरोप

अनिल देशमुख आणि सचिन वाझे

मुंबई – माजी गृहमंत्री कारागृहातून जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख त्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते. मी त्यांच्याजवळ पैसे घेत होतो, असा आरोप उद्योगपती मुकेश अंबानी यांना खंडणीसाठी धमकी दिल्याच्या प्रकरणी सध्या कारागृहात असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केला आहे. कारागृहातून वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतांना सचिन वाझे यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेशी बोलतांना हा आरोप केला.

वाझे यांनी म्हटले आहे की, फडणवीस यांना पत्र देऊन ही माहिती मी दिली आहे. सीबीआयकडेही तसे पुरावे आहेत. देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत.

‘उद्धव आणि आदित्य ठाकरे, अजित पवार अन् अनिल परब यांच्यावर आरोप केल्यास तुम्हाला ‘ईडी’च्या प्रकरणातून मुक्त करू’, असा दबाव समित कदम यांच्या माध्यमातून फडणवीस यांनी आणल्याचे देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यावर समित कदम यांनी देशमुख यांनीच त्यांना बोलावल्याचे स्पष्टीकरण दिले होते.