नाशिक – केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादकांना परवाना देणारे विपणन आणि तपासणी संचालनालय (एगमार्क) कार्यालय नाशिकरोड परिसरात असून धुळे येथील डेअरी प्रॉडक्ट्स बनवणार्या आस्थापनाने परवाना घेण्यासाठी या कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या वेळी विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकर यांनी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. हे समजताच मुंबईच्या सीबीआय पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.
सीबीआयने या प्रकरणी कार्यालयातील आणखी काही कर्मचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तळवडकर यांनी सहकारी कर्मचार्यांसाठी ही लाच स्वीकारल्याचे प्रथम चौकशीतून समोर आले आहे. सीबीआयच्या या कारवाईने केंद्रीय कृषी विभागात खळबळ उडाली आहे. लाचखोरास नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात उपस्थित केले.
संपादकीय भूमिका :अशा प्रकरणांमुळे ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ असे होण्याऐवजी ‘भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला भारत’ अशीच प्रतिमा निर्माण होत आहे. हे पालटण्यासाठी महत्त्वाच्या खात्यांमध्ये राष्ट्रप्रेमी आणि प्रामाणिक व्यक्ती असणे आवश्यक ! |