|
कोलकाता (बंगाल) – येथील आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांप्रकरणी मानवी तस्करीचा संबंध असल्याचे समोर येत आहे. रुग्णालयात मानवी अवयवांची तस्करी चालते. त्याचा सुगावा मृत महिला डॉक्टरला लागला होता. ती ही गोष्ट उघड करील, या भीतीतून तिची हत्या करण्यात आली असल्याचे या मृत महिला डॉक्टरसमवेत शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी सीबीआयला सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १९ जणांची चौकशी केली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक जणांनी रुग्णालयातून मानवी अवयवांच्या तस्करीचे जाळे असल्याची माहिती दिली आहे.
ही घटना सामान्य वाटावी, यासाठी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बर्याच कालावधीपासून लैंगिक संबंध आणि अमली पदार्थ यांचे जाळे असल्याचा आरोप आहे. ऑगस्ट २००१ मध्ये या महाविद्यालयामध्ये सौमित्र विश्वास नावाच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली होती. त्या घटनेचे धागेदोरेही आताच्या घटनेशी संबंधित आहेत.
सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, चौकशीत महाविद्यालयाच्या ४ जणांची नावे समोर आली आहेत. यांतील तिघे डॉक्टर असून एक कर्मचारी आहे. हे चौघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. ते रुग्णालयात लैंगिक संबंध आणि अमली पदार्थ यांचे जाळे निर्माण करायचे.
संपादकीय भूमिकाप्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे कृत्य वैद्यकीय महाविद्यालयात चालू असल्याची माहिती होती, तर त्यांनी आधीच याविषयी पोलीस किंवा सरकार यांना हे का सांगितले नाही ? |