Tomb Of Raja Krishnadevaraya : विजयनगरचे सम्राट राजा कृष्णदेवराय यांच्या समाधीस्थळाचे मांस विक्रीकेंद्रात रूपांतर : सरकारचा निष्काळजीपणा !

बसानगौडा पाटील यत्नाळ

बेंगळुरू – भारतीय इतिहासातील महान शासक विजयनगरचे सम्राट राजा कृष्णदेवराय यांच्या समाधीस्थळाचे मांस विक्रीकेंद्रात रूपांतर झाले आहे.  कन्नडभूमीचे गौरव, असामान्य प्रशासक आणि अद्वितीय सेनानी असलेल्या राजा कृष्णदेवराय यांचा हा अपमान आहे, असे मत विजापूरचे आमदार बसानगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केले.

प्रतिकात्मक चित्र

यत्नाळ यांनी‘एक्स’वर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे की, ‘हिंदूंंची मंदिरे पाडून देशाची संपत्ती लुटणार्‍या आणि सहस्रो हिंदूंची अमानुष हत्या करणार्‍या औरंगजेबाच्या समाधीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग करदात्यांच्या पैशांतून संरक्षण करत आहे. दुसरीकडे मात्र विजयनगर साम्राज्याचा विस्तार करणारे महापराक्रमी, कला आणि साहित्य क्षेत्राचे संरक्षक राजा कृष्णदेवराय यांच्या समाधीविषयी इतका निष्काळजीपणा का? हा केवळ कन्नडिगांचाच नव्हे, तर राष्ट्राचा अपमान आहे.

मांसाची विक्री करून समाधीस्थानाची पवित्रता नष्ट करणार्‍यांना जिल्हा प्रशासनाने त्वरित तेथून हटवावे. तसेच सरकारने तातडीने येथे स्वच्छता आणि समाधीची पवित्रता राखावी, अशी मागणी आमदार यत्नाळ यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

महापराक्रमी राजा कृष्णदेवराय यांच्या विजयनगरचे साम्राज्य सर्वश्रेष्ठ साम्राज्यांपैकी एक मानले जाते. कर्नाटकातील विद्यमान हिंदुद्वेषी काँग्रेसला शासनाला याची जाण आणि भान नसणे आणि राजांच्या समाधीस्थळाचे मांस विक्री केंद्रात रूपांतर करणे, यात नवल ते काय ? हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !