देहली उच्च न्यायालयाच्या टीकेनंतर योगऋषी रामदेवबाबा यांची माघार !

नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा यांनी काही दिवसांपूर्वी ‘सरबत जिहाद’विषयी विधान केले होते. त्याचे व्हिडिओ प्रसारित झाले होते. या संदर्भात देहली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘या विधानामुळे न्यायालयाच्या विवेकाला धक्का बसला. हे विधान क्षमा करण्यायोग्य नाही’, अशा शब्दांत टीका केली. त्यानंतर योगऋषी रामदेवबाबा यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, ‘आम्ही असे सर्व व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून काढून टाकू.’ यानंतर न्यायालयाने ‘रामदेवबाबा यांनी ‘भविष्यात अशी विधाने करणार नाहीत’ असे प्रतिज्ञापत्र द्यावे. रामदेवबाबा यांनी अशा गोष्टी त्यांच्या मनापुरत्या मर्यादित ठेवाव्यात आणि त्या उघड करू नयेत’, असे म्हटले.
Following controversy over his "Sharbat Jihad" remark, Baba Ramdev has agreed to take down the video where he accused Hamdard of using Rooh Afza profits for madrasas and masjids.
बाबा रामदेव I शरबत जिहाद#BabaRamdev #Hamdard #RoohAfza pic.twitter.com/ArV6sfX86o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2025
१. ३ एप्रिल या दिवशी रामदेवबाबा यांनी पतंजलि सरबतचे लोकार्पण केले होते. त्या वेळी त्यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करून म्हटले होते की, एक आस्थापन सरबत बनवते. यातून मिळणार्या पैशांतून ती मदरसे आणि मशिदी बांधते. ज्याप्रमाणे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘व्होट जिहाद’ चालू आहेत, त्याचप्रमाणे ‘सरबत जिहाद’देखील चालू आहे.
२. यानंतर ‘रुह अफजा’ हे सरबत बनवणार्या ‘हमदर्द’ आस्थापनाने या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती.