Canada Claims Indias Interference : (म्हणे) ‘भारत आमच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतो !’

जस्टिन ट्रुडो पायउतार झाल्यानंतरही कॅनडाचा भारतद्वेष कायम !  

ओटावा (कॅनडा) – भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येपासून बिघडलेले असतांना आता कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने आरोप केला आहे की, भारत आणि चीन २८ एप्रिल या दिवशी कॅनडामध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतात.

कॅनडाच्या सुरक्षा गुप्तचर सेवेच्या उपसंचालिका व्हेनेसा लॉयड यांच्या मते चीन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी भारत सरकार कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचाही मानस आहे. भारताकडेही ही क्षमता आहे.

कॅनडाच्या या आरोपावर तेथील चीन आणि भारत यांच्या राजदूतांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

संपादकीय भूमिका

भारताच्याच निवडणुकीत पाश्चात्त्य देश आतापर्यंत हस्तक्षेप करत आलेले असतांना भारताने त्यांच्या देशातील निवडणुकीत हस्तक्षेप करणे, असा आरोप हास्यास्पदच होय ! भारत त्याच्या शत्रूदेशात असे काहीतरी करत असता, तर भारतियांना आनंदच वाटला असता; मात्र प्रत्यक्षात असे काही केले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे !