पाक पाकव्याप्त काश्मीरमधील ‘हुंजा खोरे’ चीनला कर्जाच्या मोबदल्यात देणार !

जोपर्यंत भारत पाकव्याप्त काश्मीरवर सैनिकी कारवाई करून त्यास कायमस्वरूपी स्वत:च्या नियंत्रणात घेत नाही, तोवर पाक अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मीरमधील भूभाग चीनच्या घशात घालत रहाणार !

भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.

राजपक्षे कुटुंबियांनी भारतात आश्रय घेतलेला नाही ! – भारतीय दूतावासाचे स्पष्टीकरण

दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून अफवा पसरवली जात आहे की, श्रीलंकेतील काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत; मात्र हे वृत्त चुकीचे आहे.

कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे भारतात औषधांचा तुटवडा !

पुढील आपत्काळात औषधेच मिळणार नाहीत, याविषयी अनेक संत वारंवार सांगत आहेत. लोकहो, अशा स्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही सिद्ध आहात का ?

तालिबानने ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना ‘पुलित्झर पुरस्कार’ घोषित

भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे ही भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारी आहेत, असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर या छायाचित्रांविषयी सांगण्यात आले आहे.

भारतात आलेल्या ८०० हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने पाकमध्ये परतावे लागले !

याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

सीमाप्रश्‍न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

भारतीय सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहे. सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भक्कम स्थितीत आहे. सीमाप्रश्‍नाचे निराकरण हे मुख्य सूत्र आहे. सीमाप्रश्‍न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पहातो.

भारताच्या अस्वस्थ शेजारी राष्ट्रांचा भारतावरील परिणाम !

भारताचे शेजारी राष्ट्र असलेला श्रीलंका अतिशय कर्जबाजारी झाला आहे आणि तेथे अराजकता माजली आहे. नेपाळही कर्जबाजारी झाला असून तेथे आणीबाणी लागू झाली आहे, तर बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात होणारी घुसखोरी भारतासाठी धोकादायक बनली आहे.

पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंमध्ये असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे. भारतमातेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे.

आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही ! – भारताचे नेदरलँड्सला प्रत्युत्तर

या वर्षीच्या आरंभी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, महासभा आणि मानवाधिकार परिषद यांमध्ये युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाचा निषेध करण्यासाठी आयोजित मतदान अन् ठरावाच्या मसुद्यांपासून भारताने स्वत:ला दूर ठेवले होते.