US Voter Registration Rules : अमेरिकेत आता मतदार नोंदणीसाठी नागरिकत्वाचा पुरावा देणे आवश्यक

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला भारताचा उल्लेख

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेत पालट केला आहे. आता अमेरिकी नागरिकांना मतदार नोंदणीसाठी नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे.

ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामागे मतदार सूचीत बेकायदेशीरपणे समाविष्ट असलेल्या स्थलांतरितांवर कारवाई करणे हा उद्देश आहे.

आदेशात राष्टाध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, भारत आणि ब्राझिल मतदार ओळखपत्रांना बायोमेट्रिक (व्यक्तीच्या हातांचे ठसे, चेहरा यांद्वारे पडताळणी करणे) माहितीशी जोडत आहेत, तर अमेरिकेत नागरिक अजूनही स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांवर अवलंबून आहेत.