…तर तो दिवस दूर नाही, जेव्हा बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशमधील हिंदूंप्रमाणे अत्याचार होतील !- तथागत रॉय, माजी राज्यपाल

बांगलादेशामध्ये हिंदूंवर सतत होणार्‍या अत्याचाराविषयी जगभरातून कुणीही बोलत नाही. ज्यांचे पूर्वज सध्याच्या बांगलादेशामधील हिंदू होते, अशा बंगालमधील बहुतांश हिंदूंवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असल्याने तेही बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करत आहेत; मात्र तो दिवस दूर नाही, जेव्हा बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशातील हिंदूंप्रमाणे अत्याचार होतील ! सरकारने हिंदूंवरील आक्रमणे रोखण्यासाठी पुढे यायला हवे, तसेच बंगाल आणि देशात अन्य ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, म्हणून हिंदूंमध्ये जागृती करायला हवी. असे झाल्यास सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण होईल.