आसिफ यांने पोलिसाची पिस्तुल हिसकावून त्यांच्यावर केला गोळीबार !
भुवनेश्वर (ओडिशा) – राज्यातील झारसुगुडा येथे शेख आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. त्याने हिंदु मुलीला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी शेख आसिफला याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते, तेव्हा त्याने एका पोलिसाकडून पिस्तुल (रिव्हॉल्व्हर) हिसकावून घेतली आणि गोळ्या झाडल्या.
१. पीडित हिंदु मुलीच्या कुटुंबियांनी आसिफ याच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली, तेव्हा शेख आसिफच्या कुटुंबाने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिली.
२. झारसुगुडा पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून शेख आसिफ आणि त्याचा साथीदार यांना अटक केली.
३. १२ एप्रिल २०२५ या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. त्यावेळी शेख आसिफने एका पोलिसाकडील पिस्तुल हिसकावून घेतली. यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पिस्तुलातून ३-४ गोळ्या झाडल्या.
४. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये दोघेही घायाळ झाले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
संपादकीय भूमिका
|