अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद !

कल्याण – येथील चिंचवली गावातील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी भगवे झेंडे बनवले होते. ग्रामस्थ आकाश कशिवले हे सकाळी ७.३० वाजता मंदिरात पूजेसाठी गेले. मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. भगव्या झेंड्यांतील काही झेंडे मंदिरात आणि बाहेर जाळून टाकण्यात आल्याचे त्यांना दिसले. त्यांना पायांचे ठसेही मंदिरात दिसत होते. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य अज्ञाताने केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका
|