
बंगाल गेल्या अनेक दशकांपासून अशांत आणि हिंसाचारग्रस्त राहिलेला आहे. पूर्वी नक्षलवाद्यांची हिंसक चळवळ, नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या काळातील साम्यवाद्यांचा हिंसाचार आणि गेल्या काही वर्षांपासून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर होणारी धर्मांधांची आक्रमणे यांमुळे अशांत आहे. यावर कुणीही कठोर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतांना दिसत नाही किंवा कुणाची तशी इच्छाशक्तीही नाही, असेच चित्र आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मुसलमानांचे लांगूलचालन करून पुन्हा सत्तेत यायचे आहे, तर भाजपला तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून हटवून स्वतः सत्तेत यायचे आहे. प्रश्न तेथील हिंदूंचा आहे की, त्यांना काय हवे आहे ? त्यांना स्वतःचे रक्षण हवे आहे कि हिंदु बांधवांवरील अत्याचार हवे आहेत ? देशाची सुरक्षा हवी आहे कि बंगाल दुसरे बांगलादेश झालेले हवे आहे ? हे त्यांनीच ठरवायचे आहे. बंगालमध्ये पूर्ण राज्यात ३० टक्के मुसलमान आहेत. ही संख्या तेथील अनेक जिल्ह्यांत उलट आहे, म्हणजे हिंदू अल्पसंख्यांक आहेत आणि मुसलमान बहुसंख्यांक आहेत. बांगलादेशाच्या सीमेवरील जिल्ह्यांत तशीच स्थिती आहे. हे जिल्हे बांगलादेशमय झाले आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. येथेच अधिक प्रमाणात दंगली होऊन हिंदूंवर आक्रमणे केली जात आहेत. सध्या चालू असलेल्या वक्फ प्रकरणातील दंगली याच मुसलमानबहुल मुर्शिदाबाद या सीमेजवळील जिल्ह्यात झाल्या आहेत. आतातर दक्षिण २४ परगणा येथेही हिंसाचार झाला आहे. कदाचित् हे लोण अन्य जिल्ह्यांतही पसरू शकते; कारण या हिंसाचारामागे बांगलादेशी आतंकवादी संघटनांचा हात असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.
हिंदूंच्या असंघटितपणाचा परिणाम !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पालटण्यासाठी कठोर उपाय करणे आवश्यक आहे, हे उपाय सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कधीही करणार नाही; कारण या हिंसाचारांमागे या पक्षाचे कार्यकर्ते आणि दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात धर्मांध मुसलमान आहेत. सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याने ही स्थिती आहे. जर बंगालमधील सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली, तर काही प्रमाणात तरी यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे म्हटले जाते; मात्र यात एक अडचण अशी आहे की, जर राष्ट्रपती राजवट लावली आणि त्यानंतर निवडणुका घेतल्या, तर जनतेची सहानुभूती तृणमूल काँग्रेसला मिळू शकते. त्याचप्रमाणे राष्ट्रपती राजवट लावल्यावर मोठा हिंसाचार होऊ शकतो, ही भीती केंद्रातील सरकारला असल्याने ते राष्ट्रपती राजवट लावण्याचे धाडस करत नाही, असे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. असे आहे, तर मग बंगालमधील विरोधी पक्ष भाजपच्या कार्यकर्त्यांचे आणि हिंदूंचेही रक्षण होणे कठीण आहे. त्यांना त्यांचे सर्वस्व गमावण्याविना दुसरा पर्याय नाही. आताच मुर्शिदाबाद येथून हिंदूंनी शेजारील मालदा जिल्ह्यात पलायन केले आहे. भविष्यातून बंगालमधूनच काश्मीरप्रमाणे पलायन करावे लागले, तर आश्चर्य वाटणार नाही, अशी स्थिती तेथे आहे. फाळणीच्या वेळी बंगालचे मुस्लिम लीग सरकारचे मुख्यमंत्री सुर्हावर्दी यांच्याच आदेशाने जिनांच्या ‘डायरेक्ट ॲक्शन’ अंतर्गत लाखो हिंदूंना ठार केले गेले, हिंदु महिलांवर बलात्कार झाले. तीच स्थिती तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात बंगालमध्ये पुन्हा येईल, असेच चित्र आहे. बंगालमध्ये हिंदूंचे रक्षण करण्यासाठी त्यांचे नेतृत्व करणारा एकही प्रखर हिंदु नेता नाही. त्यामुळे हिंदू संघटित नाहीत. हिंदू संघटित नसल्याने काय होते, हे भारतातील हिंदूंनी बंगालमधून शिकले पाहिजे. यापूर्वी काश्मीरच्या प्रकरणातून हिंदू हीच गोष्ट शिकले नाहीत, म्हणून बंगाल जळत आहे. ‘हिंदूंच्या वंशसंहाराला आणि त्यांच्या पलायनाला त्यांचीच घाबरट मानसिकता कारणीभूत आहे’, असे जर कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये. ‘हिंदू मरण्याच्याच लायकीचे आहेत’, असे मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार तहव्वूर राणा याने म्हटले होते. म्हणजे आतंकवाद्यांनाही हिंदूंची मानसिकता ठाऊक आहे. सध्यातरी बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नाही. बांगलादेशात जे घडत होते, तेव्हा बंगालमधील हिंदू शांत होते, आता बंगालमध्ये जे घडत आहे, ते पाहून भारतातील उर्वरित हिंदू शांत आहेत, उद्या त्यांनाही हेच भोगावे लागणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. जोपर्यंत हिंदूंच्या प्रत्येक घरात बंगाल आणि काश्मीरसारखी स्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत हिंदू जागृत होणार नाहीत, असेच येथे वाटू लागले आहे.
बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद ! |