
मुंबई – गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवले, ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) लागू केले आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एन्.आर्.सी.)ची आवश्यकता देशाला पटवून दिली. हे निर्णय केवळ शासकीय धोरणापुरते मर्यादित नाहीत, तर हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या दिशेने पडलेली ही ठाम पावले आहेत, असे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौर्यावर आले असतांना गोपीचंद पडळकर यांनी त्यांची भेट घेऊन पुण्यश्लोक अहित्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले. ही माहिती स्वत:च्या ‘एक्स’ खात्यावरून देतांना पडळकर यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीची भावना व्यक्त केली. त्रिशताब्दी जयंतीच्या कार्यक्रमाला येण्यास अमित शहा यांनी होकार दिल्याचेही या संदेशात पडळकर यांनी म्हटले आहे.