केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगडावर घेणार छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन !

अमित शहा

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १२ एप्रिल या दिवशी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. सकाळी १०.३० वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे ते दर्शन घेतील.

सकाळी ११ वाजता रायगडाचे दर्शन आणि भ्रमण, सकाळी ११.३० वाजता रायगडावर विविध कार्यक्रमांना उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. दुपारी १२.४५ वाजता समाधीस्थळाच्या येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित रहातील. त्यानंतर दुपारी २.१५ ते ३ या वेळेत पुणे एका कार्यक्रमाला उपस्थित रहातील. दुपारी ३.३० वाजता मुंबईला यायला निघतील.  सायंकाळी ५.३० वाजता ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकाच्या ७५ व्या वर्धापनदिनाला उपस्थित रहातील. सायंकाळी ६.२० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित असणार आहेत. अशा प्रकारे अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्‍याचे नियोजन आहे.