केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देहलीच्या पोलीस आयुक्तांना फटकारले

देहलीमध्ये धर्मांधांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत मंदिरातील मूर्तींची तोडफोड करण्यात आली. याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देहलीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना कार्यालयात भेटण्यास बोलावून त्यांना फटकारले, असे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आणखी ६ मास राष्ट्रपती राजवट वाढवा !- गृहमंत्री अमित शहा यांचा लोकसभेत प्रस्ताव

जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट आणखी ६ मासांनी वाढवण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सादर केला. ‘या वर्षाच्या शेवटी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेणे शक्य होईल

अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री, तर राजनाथ सिंह संरक्षणमंत्री आणि निर्मला सीतारामन् अर्थमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप घोषित केले आहे. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्री करण्यात आले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

हे ११ वर्षांनंतर अमित शहा का बोलत आहेत ? इतकी वर्षे ते का बोलले नाहीत ? जेव्हा साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना अटक करण्यात आली, तेव्हा भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे का उभा राहिला नाही ?

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद हे कटकारस्थाने करण्यासाठी एकत्र जमत होते, हे खोटे आहे आणि दोन न्यायालयांनी हे स्पष्ट केले आहे.

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन रहित व्हावा !’ – ओमर अब्दुल्ला

न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनही महंमद अफझल आणि याकूब मेमन या आतंकवाद्यांच्या सुटकेची मागणी करणारे साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात अशी मागणी करतात, हे लक्षात घ्या ! ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, ही म्हण सार्थ ठरवणारेच अशा प्रकारची मागणी करत आहेत !

(म्हणे) ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे गोध्रा प्रकरण उघडू !’ – छगन भुजबळ

एकमेकांवर केवळ कुरघोडी करण्यात धन्यता मानणारे आणि खेकड्याप्रमाणे पाय खेचू पहाणारे लोकप्रतिनिधी लोकशाही निरर्थक ठरवतात !

हिंदूंना आतंकवादाशी जोडल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी क्षमा मागावी ! – अमित शहा

या प्रकरणी केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर पी. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह आदी काँग्रेसी नेत्यांना भाजपने कारागृहात डांबले पाहिजे ! निरपराध हिंदुत्वनिष्ठांचा कारागृहात छळ केल्याप्रकरणी काँग्रेसवाल्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच हिंदूंना न्याय मिळेल !

अमित शहा यांच्या संपत्तीत ७ वर्षांत ३ पट वाढ

सर्वच राजकारण्यांच्या संपत्तीत अल्प कालावधीत होणारी वाढ संशयच निर्माण करते ! पारदर्शकता म्हणून, तसेच लोकांच्या मनात संशयाची जागा राहू नये म्हणून अमित शहा यांनी याविषयी सखोल स्पष्टीकरण देणे जनतेला अपेक्षित आहे !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २८ फेब्रुवारीला सांगलीत !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्नाळ रस्त्यावरील धनंजय गार्डन येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मेळावा होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF