केंद्र सरकारने हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !

ब्राझिल येथील जोनास मसेटी यांनी भारतातील गुरुकुलमध्ये ४ वर्षे राहून वेदांचे शिक्षण घेतले आणि आता ते ब्राझिलमध्ये श्रीमद्भगवद्गीता अन् वेद यांचे शिक्षण देत आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दिली.

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना लोकायुक्त म्हणून नेमण्याची तरतूद करावी ! – आयरिश रॉड्रिग्स

गोवा लोकायुक्त कायद्यात सुधारणा करून कोणत्याही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना राज्याचे लोकायुक्त म्हणून नेमण्याची तरतूद करावी, अशी विनंती अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी गोवा शासनाकडे केली आहे.

श्रीलंकेतील कारागृहातील हिंसाचारात ८ कैद्यांचा मृत्यू, तर ३७ जण घायाळ

काही कैद्यांनी कारागृहामधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारागृह प्रशासनाला त्यांच्या विरोधात बळाचा वापर केल्यावर ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुलींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये; म्हणून त्यांना साधना शिकवून सात्त्विक करणे, हाच त्यावरील खरा उपाय आहे !

‘महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलन राखण्यासाठी, तसेच विश्‍वासघातकी लोकांपासून मुली अन् महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करावा – भाजपचे नेते राज पुरोहित

कुजलेल्या कांद्याऐवजी चांगला कांदा देण्याविषयी नाफेड संस्थेशी शासनाची बोलणी !   गोविंद गावडे, नागरीपुरवठा मंत्री

कुजलेला कांदा परत घ्यावा किंवा त्याच्या बदल्यात चांगला कांदा गोव्याला पुरवावा, याविषयी गोवा शासन ‘नाफेड’ या संस्थेशी बोलणी करत आहे, असे नागरीपुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

देहलीत शिवशक्ती मंदिरातील १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात धर्मांधाने बळजोरीने टिपू सुलतानची प्रतिमा लावली !

उद्दाम धर्मांध ! शासकीय कार्यालयात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची काय आवश्यकता ?

महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी !

प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच माणगाव हायस्कूल चालू केल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आरोग्य धोक्यात 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासन यांनी माणगाव हायस्कूल चालू केले.