|
उद्दाम धर्मांध ! शासकीय कार्यालयात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची काय आवश्यकता ? प्रशासकाला अंधारात ठेवून प्रतिमा लावण्याचे धाडस धर्मांधांमध्ये कुणामुळे आले हे शोधले पाहिजे ! हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करणार्या, हिंदूंवर आणि हिंदु महिलांवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची प्रतिमा लावणारे धर्मांध आणि त्यांना पाठीशी घालणारे यांंच्यावर सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
जळगाव, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – पाळधी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोणतीही पूर्वअनुमती नसतांना टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली. गावातील वाढता विरोध पहाता ही प्रतिमा कार्यालयातून काढून टाकण्यात आली होती; मात्र धर्मांधांनी पुन्हा आक्रमकपणे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामसेवक पाठक यांना धमक्या देत त्यांच्याशी वाद घातला. पोलिसांना माहिती मिळताच तेथे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि हवालदार पोचले. तरीही पोलिसांनी या प्रतिमेवर कागद लावून ती पुन्हा कार्यालयात लावून घेतली. (एरव्ही हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस मात्र धर्मांधांपुढे नांगी टाकतात ! हेच कृत्य हिंदूंनी केले असते, तर एव्हाना हिंदूंवर गुन्हा नोंद होऊन ते पोलीस कोठडीत गेले असते. असे पोलीस हिंदूंचे कधीतरी रक्षण करू शकतील का ? – संपादक)
या विरोधात २७ नोव्हेंबर या दिवशी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पाळधी खुर्द येथील ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक नेमलेले असून ग्रामसेवक डी.डी. पाठक यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रतिमा लावण्यासाठी कुठलीही अनुमती मागितलेली नाही. कुठलाही ठराव करण्यात आलेला नाही. शासनाचे तसे परिपत्रकही नाही. एका धर्मांधाने ही प्रतिमा कार्यालयात लावून सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे त्याचे छायाचित्र प्रसारित केले.
हा धर्मांध एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. ही वार्ता गावात पोचताच ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ग्रामपंचायतीवर शासनाने आता प्रशासकाची नेमणूक केलेली असतांना स्थानिक पदाधिकार्यांची मनमानी कशी काय चालते ? अशी चर्चा जनतेत आहे.
विनाअनुमती एका चौकाचे नाव ‘टिपू सुलतान चौक’ केले !धर्मांधांनी कार्यालयातून परत जाऊन देशपांडे वाडा येथील ‘अब्दुल हमीद चौक’ हे नाव पालटून ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण केले. त्या ठिकाणी ५ फूट उंचीची टिपू सुलतानची प्रतिमाही लावण्यात आली आहे. चौकाचे नामकरण आणि प्रतिमा लावण्याविषयीची कुठलीही अनुमती या धर्मांधांनी घेतलेली नाही. (पोलिसांच्या निर्ढावलेल्या भूमिकेमुळेच धर्मांधांचे फावते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अनधिकृतपणे ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा लावण्याविषयी वेळीच कठोर कारवाई केली असती तर ते धर्मांध चौकाचे नामकरण आणि तेथे प्रतिमा लावण्यास धजावले असते का ? – संपादक) |