कुजलेल्या कांद्याऐवजी चांगला कांदा देण्याविषयी नाफेड संस्थेशी शासनाची बोलणी !   गोविंद गावडे, नागरीपुरवठा मंत्री

पणजी, २९ नोव्हेंबर (वार्ता.)  – कुजलेला कांदा परत घ्यावा किंवा त्याच्या बदल्यात चांगला कांदा गोव्याला पुरवावा, याविषयी गोवा शासन ‘नाफेड’ या संस्थेशी बोलणी करत आहे, असे नागरीपुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत नाफेडने ५० मेट्रीक टन कांदा बदलून दुसरा कांदा दिला आहे. स्वस्त धान्य दुकानांच्या मालकांनी कुजलेला कांदा लोकांना न देता तो कांदा नागरीपुरवठा खात्याकडे देऊन दुसरा कांदा घ्यावा.’’