श्रीलंकेतील कारागृहातील हिंसाचारात ८ कैद्यांचा मृत्यू, तर ३७ जण घायाळ

कोलंबो (श्रीलंका) – येथून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या महारा कारागृहात झालेल्या हिंसाचारात ८ कैद्यांचा मृत्यू झाला, तर ३७ जण घायाळ झाले.

काही कैद्यांनी कारागृहामधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारागृह प्रशासनाला त्यांच्या विरोधात बळाचा वापर केल्यावर ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारागृह अधिकार्‍यांना कठोर कारवाई करावी लागली.