भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनताफ्यावर आक्रमण झाल्याच्या प्रकरणी भाजप नेत्यांकडूून तृणमूल काँग्रेसचा निषेध

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनताफ्यावर १० डिसेंबर या दिवशी दगडफेक करून आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात भाजपचे २ नेते घायाळ झाले होते.

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

शिर्डी येथे पदयात्रींनी पालख्या आणू नयेत ! – श्री साई संस्थानचे आवाहन

प्रतीवर्षी नियमित पालखी घेऊन येणार्‍या पदयात्रींनी यावर्षी पालखी आणू नये, असे आवाहन शिर्डी संस्थाननी केले.

(म्हणे) ‘केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना घरात घुसून चोप द्यावा लागेल !’

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लोकप्रतिनिधीविषयी अशी भाषा वापरणे अशोभनीय !

आमदार अरुणअण्णा लाड यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी विधानभवनात विधान परिषद सदस्यत्वासमवेत गोपनियतेची शपथ घेतली.

साहित्य संस्थांच्या अनुदानाला कोरोनाचा विळखा !

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साहित्य संस्थांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान कमी करण्यात आले आहे. अनुदानाच्या तुटपुंज्या रकमेवर साहित्य संस्था कशा चालवायच्या ?, असा प्रश्‍न संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.

(म्हणे) ‘सिंधु संस्कृतीच्या आहारात गोमांसाचे सेवन अधिक होते !’ – संशोधनातील माहिती

हिंदु गायीला ‘माता’ मानतात, हा इतिहास आणि वर्तमान आहे. असे असतांना इतिहासामध्ये गोमांस भक्षण करत असल्याचे सांगणे ही लबाडीच आहे ! सरकारने या संशोधनातील फोलपणा समोर आणून सत्य समोर आणणे आवश्यक !

कर्नाटकमध्ये गोहत्याबंदी विधेयक संमत

काँग्रेसला गोमातेपेक्षा धर्मांधांच्या जिभेचे चोचले पुरवणे अधिक प्रिय आहे. त्यामुळे ती अशा कायद्याला विरोध करते. काँग्रेसने धर्मांधांच्या लांगूलचालनापायी गेल्या ७४ वर्षांत सत्तेत असतांना राज्यांत किंवा केंद्रात गोहत्याबंदी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या !

रोहिंग्यांचे पुनर्वसन !

भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांचा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न भारतातील आतापर्यंतच्या एकाही पक्षाच्या सरकारने केलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे. विरोधी पक्षांत असतांना त्यांना देशाबाहेर काढण्याची मागणी करणारे सत्तेत असल्यावर मात्र कठोर आणि युद्धपातळीवर कृती करतांना दिसले नाहीत, हे जनता पहाते आहे.

कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी तातडीने समित्या स्थापन करा ! – मंगेश जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी

राज्यशासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहीम लवकरच चालू करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने समित्या स्थापन कराव्यात, असा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिला.