विधेयकाला विरोध करत काँग्रेसचा सभात्याग
|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकच्या विधानसभेत गोहत्या बंदी करणारे विधेयक संमत करण्यात आले. या कायद्यानुसार गाय आणि वासरू यांची हत्या अवैध ठरणार आहे. १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या म्हशींची हत्या करण्याची अनुमती यात देण्यात आली आहे.
(सौजन्य : Republic World)
गोमांसाची विक्री, वाहतूक हाही दंडनीय अपराध असणार आहे. यात एक अपवाद असून जेव्हा गाय आजारी असेल आणि त्याचा संसर्ग अन्य गायींना होणार असेल, तर अशा गायीची हत्या करण्यास अनुमती देण्यात आली आहे. गोहत्येचा आरोप असणार्यांचे खटले जलद गती न्यायालयात चालवण्यात येतील, तर गायींच्या सुरक्षेसाठी गोशाळा उघडण्याची यात तरतूद आहे. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला. याविषयीवर विरोधी पक्षनेते सिद्धारामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे.