राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विधान
असे लोकप्रतिनिधी जनतेशी कसे वागत असतील ?

मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे बोलतांना ‘नव्या कृषी कायद्यांविरोधात देहली येथे चालू असलेले आंदोलन म्हणजे कटकारस्थान आहे. आंदोलकांना चीन आणि पाकिस्तान यांचे साहाय्य मिळत आहे’, असे वक्तव्य केेले होते. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संतापात म्हटले आहे की, गेल्या वेळी रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांविषयी आक्षेपार्ह विधान केेले होते, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता; मात्र आता परिस्थिती अशी आली आहे की, दानवे यांना आता घरात घुसून चोप द्यावा लागेल ! (राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लोकप्रतिनिधीविषयी अशी भाषा वापरणे अशोभनीय ! – संपादक)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !