दाबोळी विमानतळ उड्डाणक्षेत्रातील अनधिकृत मदरशावर कारवाई करा ! – स्थानिकांची उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

दाबोळी विमानतळ उड्डाणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेसचा हिंदुद्वेष कायम !

कर्नाटकच्या विधानसभेत गोहत्येवर बंदी आणणारे विधेयक संमत करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला.

सिंधुदुर्गातील सरपंचपदांचे आरक्षण १६ डिसेंबरला घोषित होणार

वर्ष २०२० ते २०२५ या कालावधीत होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २-अ(१)(२) नुसार पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित केले आहे.

अकोला येथील वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे !

१०० भाविकांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तन यांकरिता अनुमती देण्यात यावी,या मागणीसाठीचे वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

राज्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सांगलीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, १ टन कचरा गोळा

सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. यात घाटाच्या परिसरातून १ टन कचरा गोळा करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली.

राज्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित

आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लस दिली जाईल.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जोपर्यंत न्यायालय मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासनाला नोकर भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेश यांमध्ये आरक्षण लागू करता येणार नाही.

पेठभाग, सराफकट्टा, हरभट रस्ता येथील वाहनतळ समस्या सोडण्यासाठी उपाययोजना करा ! – भाजपच्या वतीने महापालिका प्रशासनास निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, भावे नाट्यमंदिर समोरचे महापालिकेचे असलेले वाहनतळ हे दुचाकी वाहनांसाठी खुले करावे.

बुर्ली-खोलेवडी येथे कृष्णा नदीवरील पूल केंद्रीय रस्ते फंडातून करावा ! – ग्रामस्थ आणि भारतीय किसान संघाची मागणी

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली-खोलेवाडी दरम्यान कृष्णा नदीवर पूल व्हावा, अशी मागणी बर्‍याच वर्षांपासूनची तेथील ग्रामस्थांची आहे.