हिंदु एकता आंदोलनाकडून हिंदुत्वनिष्ठ आमदारांना प्रश्नावली सादर !

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंबई विधानभवन येथे ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्याचा निर्णय या अधिवेशनातच घ्यायला सरकारला भाग पाडण्यासाठी सरकारला योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रश्नावली सिद्ध करून दिली. ही प्रश्नावली विधीमंडळातील हिंदुत्वनिष्ठ आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, सौ. देवयानी फरांदे, श्री. अतुल भातखळकर, सौ. चित्रा वाघ यांना सभागृहात देण्यात आली.
११ मार्चला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने औरंगजेबाचे उदात्तीकरण सरकारने त्वरित थांबवावे, यासाठी संतप्त निदर्शने केली होती. त्या वेळी केलेल्या मागण्यांसाठी हिंदु एकता आंदोलनाने केलेल्या निदर्शनांचा संदर्भ घेऊन सरकारकडून या चालू असलेल्या अधिवेशनातच औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर घाव घालून त्याचे उदात्तीकरण रोखावे आणि संभाजीनगर जिल्हा प्रशासनाला आपण केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशा स्वरूपाचे निवेदन सर्व आमदारांना भेटून दिले.
त्यावर या सर्व आमदारांनी ‘आम्ही हा विषय सभागृहात लावून धरतो’, असे सांगितले. त्याप्रमाणे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु एकता आंदोलनाने दिलेल्या मागण्यांचे निवेदन सर्व वाहिन्यांना दिलेले आहे. या वेळी शिराळ्याचे आमदार सत्यजीत देशमुख उपस्थित होते.