कोंढवा परिसरात चारचाकी लावण्यावरून दोघांमध्ये वाद !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी लावण्यावरून दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने आक्रमण करून घायाळ केले. दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत. गणेश राखपसरे आणि आश्रफ शेख अशी दोघांची नावे आहेत. ही घटना कोंढवा येथील कौसरबाग येथील सना हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावर सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. दोघांवरही गुन्हा नोंद केला आहे.