वाहनचालकांची ‘ए.आय.’च्या तंत्रज्ञानाने पडताळणी होणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
‘ए.आय.’च्या (कृत्रिम बुद्धीमत्ता) साहाय्याने मद्य आणि अमली पदार्थ सेवन करून गाडी चालवणार्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण न्यून करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.