परप्रांतीय धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

यवत (पुणे) – उसाच्या गुर्हाळावर काम करणार्या परप्रांतीय समीर फरीदी याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली. त्याने मुलीला ‘तू मला आवडतेस. माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत बळजोरीने अत्याचार केला.
संपादकीय भूमिका : लोकसंख्येत अल्पसंख्यांक; परंतु गुन्हेगारीत पुढे असलेले धर्मांध !
पाणीपट्टी थकवणार्यांची नळ- जोडणी होणार खंडित !
सातारा – ज्या ग्राहकांनी ९ सहस्र रुपयांहून अधिक पाणीपट्टी थकवली आहे, अशांनी ती तातडीने थकबाकी भरावी. अन्यथा संबंधितांची नळजोडणी खंडित करण्यात येईल, अशी चेतावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सातार्यात ५ लाखांहून अधिक कुटुंबांचे ‘ई-केवायसी’ अपूर्ण !
सातारा – धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांचे १०० टक्के ‘ई-केवायसी’ होणे आवश्यक आहे; परंतु ग्राहक त्याची पूर्तता गांभीर्याने करत नाहीत. येथील ५ लाख ३१ सहस्र ग्राहकांचे ‘ई-केवायसी’ अपूर्ण आहे. राज्य शासनाने त्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याची पूर्तता न केल्यास शिधा बंद होऊ शकतो.
कामगारांना डांबून मारहाण करणार्यांना अटक !
५० हून अधिक कामगारांना मारहाण

शिरूर (पुणे) – ५० परप्रांतीय कामगारांना वेठबिगारासारखे राबवून घेणे, कामाचे पैसे मागितल्यावर ते देण्यास टाळाटाळ करणे, त्यांना मारहाण करत डांबून ठेवणे, ‘याची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी देणे या प्रकरणी आनंद वाघळकर, सुनील वाघळकर, प्रशांत साळवे आणि अक्षय काळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार रांजणगाव (ता. शिरूर) महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामध्ये घडला.
प्रयोगशाळा आणि पाणीपुरवठा विभाग यांच्या अहवालात तफावत !
पिंपरी-चिंचवड – अशुद्ध पाण्यामुळे ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड शहरातील १३ ठिकाणाचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिला होता; मात्र तो अहवाल चुकीचा असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. ‘कुणाचा अहवाल खरा’, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
संपादकीय भूमिका : नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा ?