
म्हापसा – वागातोर येथे ४५ वर्षीय जर्मन नागरिक सेबॅस्टियन हेस्लर याला अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची बाजारातील किंमत २३ लाख ९५ सहस्र रुपये आहे. गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई करतांना जर्मन नागरिक सेबॅस्टियन हेस्लर याच्याकडून १० ग्रॅम केटामाइन पावडर, ४०० ग्रॅम केटामाइन लिक्विड, अनेक एल्एस्डी ब्लॉट पेपर्स आणि २ किलो गांजा जप्त केला. पथकाने सांगितले की, बंगालमधील मूळ रहिवासी असलेला सेनगुप्ता ज्याला गेल्या आठवड्यात सुमारे १० लाख रुपयांचे १६ ग्रॅम एम्डीएम्ए आणि ५० हून अधिक ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली होती, त्याच्याकडून या जर्मन अमली पदार्थ विक्रेत्याची माहिती मिळाली होती.