सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – प्रतापगड (सातारा) येथे ८ डिसेंबर या दिवशी शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. प्रतापगड येथे होणार्या शिवप्रतापदिनाच्या नियोजनाविषयी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, ‘‘प्रतापगड येथे येणार्या पर्यटकांसाठी गडाचे संवर्धन आणि सुशोभीकरण यांसाठीच्या आराखड्याचे ‘थ्रीडी मॉडेल’ सिद्ध करावे. गडाची माहिती द्यावी. संवर्धनाच्या माध्यमातून गडाच्या परिसरामध्ये देण्यात येणार्या सुविधांची माहिती देण्यात यावी. गडावर विद्युत् रोषणाई करण्यात यावी. शिवप्रतापदिनी गडावर स्वच्छता करावी, तसेच ऐतिहासिक मर्दानी खेळ, पोवाडे यांचे आयोजन करावे. पर्यटकांसाठी एस्.टी महामंडळाने बसगाड्यांची सोय करावी.’’