गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास प्रभु यांची विनाअट सुटका व्हावी आणि अल्पसंख्यांक हिंदूंचे संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशा मागणीचे निवेदन गडहिंग्लज येथे प्रांत कार्यालयात देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) हे निवेदन कार्यालयातील शिस्तीदार विष्णु बुट्टे यांनी स्वीकारले. या वेळी बजरंग दलाचे श्री. विश्वनाथ पाटील, श्री. प्रवीण फल्ले, भाजप विस्तारक श्री. संदीप नाथबुवा, ‘इस्कॉन’ चे, श्री. अशोक कोळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय मुरुकुटे हे उपस्थित होते.