बेंगळुरू (कर्नाटक) येथे सिद्धगंगा स्वामीजींच्या पुतळ्याची तोडफोड
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील गिरिनगर परिसरातील वीरभद्रनगर बसथांब्याजवळ सिद्धगंगा मठाचे डॉ. शिवकुमार स्वामीजी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. स्वामीजींच्या पुतळ्याच्या कपाळाचा भाग फोडून त्याला विकृत रूप देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी शिवू नावाच्या तरुणाला अटक केली. त्याने चौकशीत, ‘येशूने स्वप्नात येऊन मला असे करण्यास सांगितले’, असे म्हटले आहे. शिवू आणि त्याचे कुटुंबीय यांचा ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती परंपरा आणि येशू याच्या भक्तीकडे विशेष कल असल्याचेही उघड झाले आहे.
यापूर्वीही ब्याडरहळ्ळी भागात हिंदूंच्या देवतेचे चित्र असलेल्या फलकावर दगडफेक केल्याचा प्रकार या व्यक्तीने केल्याचे समोर आले होते; मात्र त्या वेळी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. (हिंदुद्वेष्ट्यांवर तात्काळ कारवाई न केल्याचा परिणाम ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|