अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आदेश दिला की, अवैध पब, तसेच अमली पदार्थ विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी.

हडपसर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन !

हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी येथील नाशिक-पुणे महामार्गावर २८ जून या दिवशी शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.

इंद्रायणी नदीत सांडपाणी कुठून मिसळते, हे सांगूनही त्यावर उपाययोजना नाही ! – ह.भ.प. निरंजननाथ महाराज

वारकर्‍यांनी सांगूनही संवेदनशून्य प्रशासन यावर काहीच करत नाही, हे संतापजनक ! तथाकथित पुरोगामी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? कि त्यांचे कारखानदारांशी लागेबांधे आहेत ?

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : उद्बोधन सत्र – मंदिरांच्या रक्षणासाठी न्यायालयीन प्रयत्न

स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.

Temple Priest Beaten : बेंगळुरू (कर्नाटक) येथे मंदिराच्या पुजार्‍याला अनोळखी लोकांकडून मारहाण

बेंगळुरू येथील होसकोटे शहरातील कण्णुरू येथे अंजनेय स्वामी मंदिराचे पुजारी आनंद हे मंदिरात पूजा करून परत येत असतांना वाटेत अनोळखी समाजकंटकांनी त्यांना मारहाण केली आणि पळून गेले.

देहू (पुणे) येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान !

‘ग्यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामगजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. या नामगजराने अवघा देऊळवाडा परिसर दुमदुमून गेला होता.

शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यांची घोषणा !

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून या दिवशी वर्ष २०२४-२५ चा २० सहस्र ५१ कोटी रुपयांचा महसुली तूट असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.

मंदिराचे सौंदर्यीकरण करायला ती पर्यटनस्थळे नव्हेत, तीर्थक्षेत्रे आहेत ! – अनिल कुमार धीर, संयोजक, ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’, ओडिशा

ओडिशामधील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी २२ प्राचीन मठ तोडण्यात आले. या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, तर आम्हालाच १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

घाटावर स्नान करणार्‍या लहान मुली आणि महिला यांची छायाचित्रे काढणे अन् व्‍हिडिओ न बनवण्‍याचे लावण्‍यात आले फलक !

हरिद्वार येथे गंगा नदीच्‍या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्‍पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्‍हिडिओ बनवून ते सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित केल्‍याचे समोर आले आहे.

वक्‍फ बोर्डप्रमाणे हिंदु मंदिरांसाठी सर्वाधिकार देणारे ‘मंदिर बोर्ड’ स्‍थापन करा ! – अधिवक्‍ता विष्‍णु जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी पत्रकार परिषद विद्याधिराज सभागृह – ज्‍या प्रमाणे मुसलमानांच्‍या धार्मिक मालमत्ता आणि भूमी संरक्षित करण्‍यासाठी तत्‍कालीन काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्ड स्‍थापन करून त्‍याला विशेष कायदेशीर अधिकार दिले आहेत, त्‍याच धर्तीवर देशभरातील हिंदूंची लाखो मंदिरे, त्‍यांची भूमी आणि संपत्ती संरक्षित करण्‍यासाठी वक्‍फ बोर्डाप्रमाणे मंदिरांसाठी सर्वाधिकार असलेला ‘हिंदु मंदिर बोर्ड’ स्‍थापन करण्‍यात … Read more