Temple Priest Beaten : बेंगळुरू (कर्नाटक) येथे मंदिराच्या पुजार्‍याला अनोळखी लोकांकडून मारहाण

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील होसकोटे शहरातील कण्णुरू येथे अंजनेय स्वामी मंदिराचे पुजारी आनंद हे मंदिरात पूजा करून परत येत असतांना वाटेत अनोळखी समाजकंटकांनी त्यांना मारहाण केली आणि पळून गेले.

यात मारहाणीत घायाळ झाल्याने आनंद यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.