No Pakistani Films N Artists In Maharashtra : पाकिस्‍तानी चित्रपट आणि कलाकार यांना महाराष्‍ट्रात बंदीच ! – अमेय खोपकर, चित्रपट सेना अध्‍यक्ष, मनसे

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्‍यक्ष अमेय खोपकर

मुंबई – पाकिस्‍तानी चित्रपट आणि कलाकार महाराष्‍ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत. त्‍यांना येथे काम करू देणार नाही. त्‍यांचा चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही, असे विधान मनसेचे चित्रपट सेनेचे अध्‍यक्ष अमेय खोपकर यांनी केले. (पाकिस्‍तान्‍यांविषयी रोखठोक भूमिका घेणारे अमेय खोपकर यांचे अभिनंदन ! – संपादक) यासंदर्भात आंदोलन करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

अमेय खोपकर पुढे म्‍हणाले, ‘‘एक पाकिस्‍तानी चित्रपट त्‍यांना संपूर्ण भारतात प्रदर्शित करायचा आहे. सर्व चित्रपटगृहांना आम्‍ही योग्‍य ते सांगितले आहे. आपल्‍याला आवश्‍यकता काय आहे पाकिस्‍तानची ? आपल्‍याकडे कलाकारांचा अभाव आहे का ?  तुम्‍ही आमच्‍यावर आक्रमणे करणार आणि आम्‍ही इकडे पाकिस्‍तानचे कलाकार जोपासायचे ? हे रोखण्‍यासाठी जे काही करावे लागेल, ते आम्‍ही करू.’’

संपादकीय भूमिका

अशी राष्‍ट्रहितैशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घ्‍यायला हवी. तसे झाल्‍यास पाकिस्‍तान्‍यांचे भारतात पाऊल टाकण्‍याचे धाडस होणार नाही !