|
मुंबई – धारावी येथे मेहबुब ए सुबानिया या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या गाडीच्या काचा स्थानिक मुसलमानांनी फोडल्या. तोडकामाच्या वेळी शेकडो मुसलमान उपस्थित होते. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ‘तोडकामाची कारवाई होऊ नये, तिला स्थगिती द्यावी’, यासाठी पत्र दिले. त्यांनी संबंधित अधिकार्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. तोडकामाची कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली होती.
वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे, ‘ही मशीद अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. ‘धारावी पुनर्वसन प्राधिकरणा’कडून मशिदीच्या अतिक्रमणाची चौकशी करण्यात यावी. तिच्या अतिक्रमणाविषयीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घ्यावा.’
धारावीतील जिहाद्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथे जाऊन अरेरावी दाखवावी ! – नितेश राणे, आमदार, भाजप
भाजपचे आमदार आणि नेते नितेश राणे म्हणाले, ‘‘मी वारंवार बोलत आहे. या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देश आणि महाराष्ट्र येथे ‘शरीयत कायदा’ लागू करायचा आहे. कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो, हे अतिक्रमण केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ते तोडण्याच्या वेळी तेथील जिहाद्यांनी ते तोडू दिले नाही. पालिकेच्या गाड्या फोडल्या. ही अरेरावी आणि दादागिरी त्यांनी त्यांच्या देशात म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश येथे जाऊन दाखवावी.’’
४ ते ५ दिवसांत मशिदीचे अतिक्रमित बांधकाम हटवू ! – मशिदीचे विश्वस्त
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम हटवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने ४ ते ५ दिवसांची समयमर्यादा द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी केलीे. प्रशासनाने ही विनंती मान्य करत ‘ठरलेल्या समयमर्यादेत हे अतिक्रमित बांधकाम हटवावे’, असे निर्देश विश्वस्तांना दिले आहेत.
संपादकीय भूमिका
|