हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडरही ठार
बेरूत (लेबनॉन) : इस्रायलने २४ घंट्यांत लेबनॉनवर २ वेळा हवाई आक्रमण केले. राजधानी बेरूतमधील दहियाह भागात हे आक्रमण करण्यात आले. यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर आणि ‘जिहाद कौन्सिल’चा सदस्य इब्राहिम अकील हाही ठार झाला आहे. बेरूतमध्ये वर्ष १९८३ मध्ये अमेरिकी तळावरील आक्रमणाच्या प्रकरणी अकील अमेरिकेच्या पसार आतंकवाद्यांच्या सूचीतमध्ये होता.
इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी सांगितले की, त्यांनी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या १०० हून अधिक रॉकेट लाँचरवर आक्रमण करून ते नष्ट केले. आम्ही त्यांचे १ सहस्र रॉकेट बॅरल नष्ट केले. या शस्त्रांंसह हिजबुल्ला इस्रायलवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होता.