वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासातील अधिकार्याचा मृतदेह सापडला आहे. भारतीय दूतावास सदर अधिकार्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे.
Indian Embassy Officer Found Dead:
The dead body of an #Indian Embassy officer was found in America#Death #Mysterious pic.twitter.com/HwR6CeH3Or
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2024
अधिकार्यांनी सांगितले की, प्राथमिक अन्वेषणात असे दिसून आले की, संबंधित अधिकार्याने गळफास लावून घेतला. कुटुंबाची गोपनीयता लक्षात घेऊन दूतावासाने मृत अधिकार्याशी संबंधित माहिती सार्वजनिक केलेली नाही. अधिकार्याचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत पाठवला जाईल. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या घटनेचे अन्वेषण करत आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार तेथील पोलिसांनी सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण असून त्या अनुषंगाने अन्वेषण चालू आहे.