मैसुरू-कोडगू येथील भाजपचे खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज ओडेयार यांचे विधान
(महिष दसरा म्हणजे महिषासुराचे उदात्तीकरण करणे)
मैसुरू (कर्नाटक) – महिष दसरा साजरा करण्यासाठी राज्यघटनेने अनुमती दिलेली आहे. महिष दसरा साजरा करण्यास आमचा विरोध नाही, असे मैसुरू-कोडगू मतदारसंघातील भाजपचे खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज ओडेयार यांनी स्पष्ट केले. ‘मी एक लोकप्रतिनिधी आहे. हा सण साजरा करणे संबंधितांचा हक्क आहे. याला विरोध करणार्यांनाच याविषयी विचारावे’, असेही ते म्हणाले.
🛑 “We do not oppose celebrating Mahisha Dasara!” – BJP MP from Mysuru-Kodagu, Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar (@yaduveerwadiyar )
👉However, those who celebrate Mahisha Dasara are anti-Hindu, and it is inappropriate to grant them such permission. By celebrating Mahisha… pic.twitter.com/8Zt2ejquxf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2024
खासदार ओडेयार पुढे म्हणाले की, महिष दसरा सार्वजनिकपणे किंवा त्यांच्या घरातही साजरा केला जाऊ शकतो. चामुंडी पर्वतावर दसरा साजरा होत असल्यामुळे ‘तो तिथे साजरा करू नका’, असे सांगितले जात आहे. जर तोतिथेच साजरा करण्याचा आग्रह धरत असतील, तर मी याविषयी चर्चा करेन.
संपादकीय भूमिकामहिष दसरा साजरा करणारे हिंदुविरोधी असून त्यांना अशा प्रकारे अनुमती देणे, अयोग्य आहे. महिष दसरा साजरा करून ते राक्षसी वृत्तीचे समर्थन आणि देवतांना विरोध करत आहेत. हिंदूंनी वैध मार्गांनी या प्रकारांना विरोध केला पाहिजे ! |